राजकीय
मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जोन्नतीसाठी नागपुरात महत्त्वाची बैठक
By nisha patil - 11/12/2025 1:02:04 PM
Share This News:
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याबाबत महत्त्वाची बैठक झाली. आमदार डॉ. विनय कोरे यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे व परिसरातील 30–40 गावांमधून येणाऱ्या रुग्णांच्या प्रचंड वाढलेल्या ताणावर चर्चा करत तातडीने सेवांचा विस्तार करण्याची मागणी केली.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मलकापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवा सुरू करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगत डायलिसिससह आवश्यक सेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. एक महिन्यात पाहणी करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेशही देण्यात आले.
मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जोन्नतीसाठी नागपुरात महत्त्वाची बैठक
|