राजकीय
कोल्हापूर महापालिकेत शिष्टमंडळांची महत्वपूर्ण बैठक...
By nisha patil - 11/23/2025 2:06:15 PM
Share This News:
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाबरोबर शहरातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला आमदार जयंत आसगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंकुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत ही बैठक मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क येथे झाली.
बैठकीत शहरातील अनेक ठोस मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये फेरवाले संघटनेचे प्रश्न, दुकानदार व गाळाधारकांच्या अडचणी, वारसाहक्क नियुक्ती, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी सुविधा, आरोग्य व स्वच्छता, तसेच विविध समाज आणि सामाजिक संस्थांचे प्रलंबित प्रश्न यांचा समावेश होता. सर्व शिष्टमंडळांनी आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडले.
आमदार जयंत आसगावकर यांनी मांडलेले मुद्दे प्रभावीपणे नोंदवून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी या समस्यांचे वेळेत निराकरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, फेरीवाले व दुकानगाळेधारक संघटनांचे शिष्टमंडळ, विविध समाजांचे प्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी उपस्थित
कोल्हापूर महापालिकेत शिष्टमंडळांची महत्वपूर्ण बैठक...
|