राजकीय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक
By nisha patil - 12/25/2025 3:02:12 PM
Share This News:
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बुधवारी (दि. २४) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव श्री. सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, तसेच आचारसंहिता लागू करण्याबाबतच्या शक्यतांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, नियमांचे काटेकोर पालन तसेच निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही विविध सूचना आणि मत मांडली.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक
|