ताज्या बातम्या

चीनमध्ये ‘PCC-1’ अँटी-एजिंग औषधावर महत्त्वाचे संशोधन; मानवी आयुष्य वाढवण्याचा दावा

Important research on PCC1anti aging drug in China


By nisha patil - 11/15/2025 1:24:48 PM
Share This News:



मानवाचे आयुष्य मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या दिशेने चीनमध्ये महत्त्वाचे संशोधन सुरू असून, शेनझेनमधील Lawnvi Biosciences कंपनी ‘PCC-1’ नावाची विशेष अँटी-एजिंग गोळी विकसित करत आहे. ही गोळी द्राक्षांच्या बियांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्यानिडिन C-1 या नैसर्गिक घटकावर आधारित आहे.

उंदरांवर करण्यात आलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये या संयुगाने वृद्ध पेशींना निवडकपणे नष्ट केले, तर निरोगी पेशी सुरक्षित राहिल्या असल्याचे संशोधकांनी आढळून आणले आहे. या उपचारामुळे उंदरांच्या आयुर्मानात ९ टक्के वाढ झाल्याचे आणि त्यांच्या वयोमानात ६४ टक्के सुधारणा झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या औषधाच्या मदतीने भविष्यात माणसाचे आयुष्य १५० वर्षांपर्यंत वाढवणे शक्य होऊ शकते. मात्र, तज्ज्ञांचा इशारा आहे की हा दावा अद्याप केवळ प्रयोगशाळेपुरताच मर्यादित असून त्याची वैज्ञानिक प्रमाणिकता सिद्ध होणे बाकी आहे. या औषधाची मानवांवरील क्लिनिकल चाचणी अद्याप झालेली नाही, त्यामुळे प्रत्यक्ष परिणाम आणि सुरक्षितता जाणून घेण्यासाठी आणखी मोठे संशोधन आवश्यक असल्याचे संशोधक स्पष्टपणे सांगत आहेत.


चीनमध्ये ‘PCC-1’ अँटी-एजिंग औषधावर महत्त्वाचे संशोधन; मानवी आयुष्य वाढवण्याचा दावा
Total Views: 41