बातम्या

१ नोव्हेंबरपासून बदलणार देशातील महत्त्वाचे नियम — आधार अपडेटपासून गॅस दरांपर्यंत नवे नियम लागू!

Important rules of the country will change from November 1

By nisha patil - 10/30/2025 5:05:05 PM
Share This News:

१ नोव्हेंबरपासून बदलणार देशातील महत्त्वाचे नियम — आधार अपडेटपासून गॅस दरांपर्यंत नवे नियम लागू!

ऑक्टोबर महिना संपताच १ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय बदल लागू होणार आहेत. UIDAI ने आधार अपडेट प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली असून नागरिकांना आता घरबसल्या नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर दुरुस्त करता येणार आहेत.
 
बँक खात्यांसाठी ग्राहकांना चारपर्यंत नॉमिनी नोंदवता येतील, तर शाळा- कॉलेज फी थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे भरल्यास १% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. SEBIच्या नव्या नियमानुसार, म्युच्युअल फंड कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी ₹१५ लाखांहून अधिक गुंतवणुकीबाबत तत्काळ माहिती द्यावी लागेल. तसेच, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर १ नोव्हेंबरपासून पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

१ नोव्हेंबरपासून बदलणार देशातील महत्त्वाचे नियम — आधार अपडेटपासून गॅस दरांपर्यंत नवे नियम लागू!
Total Views: 57