ताज्या बातम्या
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट — मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
By nisha patil - 11/15/2025 12:35:52 PM
Share This News:
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत एक महत्त्वाचा टप्पा पार झाल्याची माहिती दिली आहे. एक कोटींहून अधिक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये यासाठी विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
तटकरे म्हणाल्या की, पती गमावलेल्या, घटस्फोटित किंवा एकल महिलांना लाभ मिळण्यासाठी शासकीय वेबसाईटवर आवश्यक बदल सुरू आहेत. अशा महिलांना मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र थेट पोर्टलवर अपलोड करण्याचे पर्याय उपलब्ध केले जात आहेत.
तसेच १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी सुरू आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कागदपत्रे गमावलेल्या महिलांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय शासनाकडून घेतला जात आहे.
ही सर्व सुधारणा लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व पात्र बहिणींना तातडीने व अडथळारहित मिळावा यासाठी करण्यात येत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट — मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
|