खेळ

हेरवाडच्या लेकींची कबड्डीत दमदार कामगिरी

Impressive performance by the girls from Herwad in Kabaddi


By nisha patil - 3/11/2026 11:38:29 PM
Share This News:



हेरवाडच्या लेकींची कबड्डीत दमदार कामगिरी
 

राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय, विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक; गावाचा नावलौकिक उंचावला.......... 

हेरवाड : प्रतिनिधी, आचिन हेरवाडे......  मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा कबड्डी स्पर्धेत हेरवाडच्या कन्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गावाचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला. चौदा वर्षांखालील (U-14) गटात हेरवाडची कन्या कु. श्वेता मनोहर धावणे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
 

तसेच सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेतही हेरवाडच्या मुलींनी आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली. सतरा वर्षांखालील (U-17) गटात गावच्या कन्यांनी तृतीय क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली.
 

या स्पर्धेत कु. ऋतुजा राहुल बरगाले, कु. देवयानी किरण नेर्ले, कु. सृष्टी शशिकांत बरगाले आणि कु. उत्कर्षा मनोहर धामणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या सर्व खेळाडूंनी कठोर परिश्रम, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांना रमेश डोंगरे व संतोष चिंदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

ग्रामीण भागातील मुलींनी राज्य व विभागीय स्तरावर मिळवलेले हे यश हेरवाड गावासाठी अभिमानास्पद ठरत आहे. त्यांच्या यशाबद्दल ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.हेरवाडच्या या क्रीडापटू कन्यांनी आपल्या कामगिरीतून ग्रामीण भागातील मुलीही क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेऊ शकतात, हे सिद्ध केले आहे.


हेरवाडच्या लेकींची कबड्डीत दमदार कामगिरी
Total Views: 83