बातम्या
महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा करा – आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना
By nisha patil - 7/21/2025 10:23:05 PM
Share This News:
महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा करा – आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना
कोल्हापूर, दि. २१ : कोल्हापूर महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रकल्पांबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, या कामांमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत त्यांनी झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्ड वाटप, झूम प्रकल्प, हद्दवाढ, आयटी पार्क, घरफाळा, स्ट्रीट लाईट, बंद शाळा, पाणीपुरवठा आणि वाहनतळ आदी विषयांवर सखोल आढावा घेतला.
झोपडपट्ट्यांतील प्रॉपर्टी कार्ड वाटप तातडीने पूर्ण करावे, झूम प्रकल्पासाठी शासनाकडे सूट मिळवावी, हद्दवाढीबाबत प्रस्ताव पाठवावा, आणि ड्रोन सर्वेक्षणाद्वारे सुधारित घरफाळा आकारावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी देखभाल वेळेत व्हावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच बंद शाळा बीओटी तत्त्वावर सुरू करता येतील का याचा विचार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
महानगरातील ओपन स्पेसचा उपयोग नागरिकांसाठी करण्याचे नियोजन करावे, आणि वाहनतळाचे काम लवकर पूर्ण करून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या प्रकल्पांमध्ये सुधारणा करा – आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना
|