बातम्या

वर्तन सुधारा, नाहीतर घरचा रस्ता पकडा!" – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट इशारा

Improve your behavior

By nisha patil - 7/15/2025 12:19:16 PM
Share This News:

वर्तन सुधारा, नाहीतर घरचा रस्ता पकडा!" – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट इशारा

 गैरवर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागळते आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील मंत्र्यांना फटकारले. "मला ऐकून घ्यावं लागतंय, तुमचं वर्तन बदला नाहीतर घरी जावं लागेल," असा थेट इशारा त्यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती त्या बैठकीत दिला.

मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वर्तन चर्चेचा विषय ठरत असताना, सोमवारी शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांची विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "कुणालाही पाठीशी घालणार नाही. प्रेमाने वागतो, पण गरज पडली तर कारवाईही करू."

वर्तन सुधारा, नाहीतर घरचा रस्ता पकडा!" – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट इशारा
Total Views: 76