बातम्या
कागलमध्ये पदवीधरांचे 29.27%, तर शिक्षकांचे 33.57% मतदान; दुपारी 12 वाजेपर्यंतची आकडेवारी!
By nisha patil - 10/23/2026 2:26:29 PM
Share This News:
कागलमध्ये पदवीधरांचे 29.27%, तर शिक्षकांचे 33.57% मतदान; दुपारी 12 वाजेपर्यंतची आकडेवारी!
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक 2026 साठी कागल तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरू असून, सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघात 29.27 टक्के, तर शिक्षक मतदारसंघात 33.57 टक्के मतदान झाले आहे.पदवीधर मतदारसंघात एकूण 17,620 मतदार आहेत. त्यापैकी 3,740 पुरुष आणि 1,418 महिला अशा एकूण 5,158 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात इतर प्रवर्गातील दोन मतदार असून, त्यापैकी एकानेही मतदान केलेले नाही.
शिक्षक मतदारसंघात एकूण 858 मतदार आहेत. त्यापैकी 204 पुरुष आणि 84 महिला अशा एकूण 288 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 33.57 टक्के झाली आहे.दुपारी 12 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पदवीधर मतदारसंघात 5,158, तर शिक्षक मतदारसंघात 288 मतदारांनी मतदान केले आहे.
कागलमध्ये पदवीधरांचे 29.27%, तर शिक्षकांचे 33.57% मतदान; दुपारी 12 वाजेपर्यंतची आकडेवारी!
|