राजकीय
न्यू शाहूपुरीत महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदारांचा नागरिकांशी संवाद
By nisha patil - 5/1/2026 5:45:46 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू शाहूपुरी परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. सकाळी ८.३० वाजता मेघदूत अपार्टमेंट, पाटणकर कॉलनी येथे ही भेट घेण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल आभार मानले. तिसऱ्यांदा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचे नमूद करत, स्थानिक आमदार निधी तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या विकास निधीतून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांना दिली. परिसरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोल्हापूरच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नकारात्मक राजकारण व निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहावे, तसेच महायुतीच्या उमेदवारांना मत रुपी आशीर्वाद देऊन महानगरपालिकेत मोठ्या संख्येने पाठवावे, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी नागरिकांना केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, उपशहर प्रमुख विश्वजीत मोहिते, नियोजन समितीचे सदस्य अंकुश निपाणीकर, उमेदवार श्री. प्रमोद देसाई, सौ. वंदना मोहिते, सौ. राजनंदा महाडिक, श्री. विजयेंद्र माने, श्री. प्रसाद कामत, श्री. प्रमोद अतिगरे, श्री. सचिन जाधव, श्री. महेश गवळी, श्री. संदीप चिगरे, श्री. मुकुंद सावंत, श्री. बाळ मोरे, श्री. संदीप पोवार, श्री. पराग शाह, श्री. प्रमोद शाह, श्री. दिनकर सावंत, श्री. खंगले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यू शाहूपुरीत महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदारांचा नागरिकांशी संवाद
|