बातम्या
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्यावतीने सार्वजनिक गणेश मंडळांसोबत बैठक संपन्न
By nisha patil - 7/8/2025 3:12:04 PM
Share This News:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्यावतीने सार्वजनिक गणेश मंडळांसोबत बैठक संपन्न
कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट २०२५ : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्यावतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०० ते ७.२० या वेळेत खरे मंगल कार्यालयात मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला १५० ते २०० गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सव शांततामय आणि अनुशासित पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने विविध महत्वाच्या सूचना करण्यात आल्या.
बैठकीतील महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे:
🔸 डॉल्बी / डीजेचा वापर टाळावा, त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
🔸 गणेशमूर्ती लहान, सुंदर व आकर्षक ठेवावी.
🔸 गणेशमूर्ती जवळ २४ तास स्वयंसेवकांची उपस्थिती आवश्यक.
🔸 सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये.
🔸 आक्षेपार्ह मेसेज, फोटो, व्हिडीओ आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
🔸 परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींविषयी माहिती पोलीस ठाण्यास द्यावी.
🔸 मिरवणूक वेळेत सुरू आणि वेळेतच समाप्त करावी.
🔸 ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे काटेकोर पालन करावे.
🔸 प्रत्येक मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांशी सहकार्य करावे आणि कोणताही अनुचित प्रकार टाळावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्यावतीने सार्वजनिक गणेश मंडळांसोबत बैठक संपन्न
|