बातम्या
*आयुष्य न्यूट्रिशन सेंटरचा उद्घाटन सोहळा सुमन नार्वेकर यांचे हस्ते उत्साहात संपन्न
By nisha patil - 5/11/2026 2:29:15 PM
Share This News:
*आयुष्य न्यूट्रिशन सेंटरचा उद्घाटन सोहळा सुमन नार्वेकर यांचे हस्ते उत्साहात संपन्न
*निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती-सौ. सुमन नार्वेकर
*आजरा(हसन तकीलदार):-निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती हा संदेश देत आजरा येथील आयुष्य न्यूट्रिशन सेंटरचा उद्घाटन सोहळा उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला.
आजरा शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष महेश नार्वेकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन नार्वेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्तेच या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
या सेंटरमध्ये तब्बल ८१ प्रकारचे फ्लेवर्स उपलब्ध असून, आजरा तालुक्यातील नागरिकांसाठी फ्री ऑनलाईन /ऑफलाईन वर्कऔट , बॉडी चेकअप, आहारविषयक मार्गदर्शन, जीवनशैलीविषयक मार्गदर्शन तसेच वर्क फ्रॉम होम संधींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी आरोग्य सल्लागार परसु कोले , प्रिती कोले , अमोल देसाई, रवींद्र सावंत, भास्कर बुरुड, तेजश्री बुरुड, अमोल कांबळे ,प्रणाली नलावडे व दीपक कोरवी यांनी उपस्थितांना आरोग्याचे महत्त्व, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले.निरोगी शरीर आणि स्वास्थ्य हीच खरी संपत्ती असल्याचे सौ. सुमन नार्वेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला प्रियांका सुदीप नार्वेकर, अश्विनी सचिन पोवार, पूजा प्रमोद भुईबर, दीपाली कोरवी, अर्चना नितीन बुरुड, अमित पाटील, रेश्मा सुधाकर परीट, सचिन पाटील, मारुती कालेकर, बाळू शिंत्रे, रघुनाथ कातकर, सागर कुंभार, ओमकार प्रभू, पूनम देसाई, दिनकर पाटील, गणपत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुष्य न्यूट्रिशन सेंटर, SBI बँकेसमोर, मिल्क कॉर्नर, वरचा मजला, आजरा.या ठिकाणी हे सेंटर सुरु करण्यात आले आहे.निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या सेंटरला नागरिकांनी एकदा भेट देऊन उपलब्ध सुविधांची माहिती घ्यावी, असे आवाहन सौ. सुमन नार्वेकर यांनी यावेळी केले आहे.
*आयुष्य न्यूट्रिशन सेंटरचा उद्घाटन सोहळा सुमन नार्वेकर यांचे हस्ते उत्साहात संपन्न
|