बातम्या
कागलमध्ये १.१५ कोटींच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा
By nisha patil - 6/5/2025 5:23:35 PM
Share This News:
कागलमध्ये १.१५ कोटींच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा
जयसिंगराव पार्क व विजयमाला गार्डनचे नुतनीकरण
रमाई आवास योजनेतील ९९ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण
कागल शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये जयसिंगराव पार्क येथे सैनिकांकरीता अमरज्योती स्मारक कंपाऊंड वॉल बांधकाम कामांचा, २००९ साली जयसिंगराव पार्क येथे लोकार्पण झालेले विजयमाला गार्डनचे १५ वर्षानंतर नुतनीकरण कामांचा, यशवंत किल्ला येथे बॅडमिंटन कोर्ट, मॅट बसवणे व अनुषंगिक कामांचा, चिंतामणी पार्क येथे ओपन जिम कामांचा, रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर ९९ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप इत्यादी १.१५ कोटी कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर, शहराध्यक्ष संजय चितारी, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कागलमध्ये १.१५ कोटींच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा
|