बातम्या

कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंचचे उदघाटन

Inauguration of Bombay High Court Circuit Bench in Kolhapur


By nisha patil - 8/16/2025 2:51:35 PM
Share This News:



कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंचचे उदघाटन

१७ ऑगस्टला सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते सोहळा

कोल्हापूर : सहा जिल्ह्यांच्या वकिलांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार असून मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येत्या रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी उदघाटन होत आहे. दुपारी ३.३० वाजता न्यायालयीन इमारतीतील उदघाटन सोहळा भारताचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. त्यानंतर मेरी वेदर ग्राउंड, नागाळा पार्क येथे दुपारी ४ वाजता मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मेरी वेदर ग्राउंडवर मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येणार असून वकिलांनी दुपारी २ वाजेपर्यंत मंडपामध्ये जागा घेणे आवश्यक आहे. उपस्थित वकिलांनी शक्यतो ब्लेझर परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पार्किंग व्यवस्था :

  • सांगली, साताऱ्याहून येणाऱ्या वकिलांसाठी – पोलीस परेड ग्राउंड, कसबा बावडा

  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग – महासैनिक दरबार हॉल

  • सोलापूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

  • कोल्हापूर जिल्हा – जिल्हा न्यायालयाचे पार्किंग

कार्यक्रमानंतर वकिलांसाठी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून महासैनिक दरबार हॉल येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंचचे उदघाटन
Total Views: 134