बातम्या
प्रभाग क्र. 9 मधील सुभाष गल्ली रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
By Administrator - 3/24/2026 3:40:42 PM
Share This News:
प्रभाग क्र. 9 मधील सुभाष गल्ली रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
आजरा (हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 9 मधील सुभाष गल्लीतील रस्त्याच्या काँक्रिटिकरण कामाचे शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य, माजी आजरा साखर संचालक, माजी शेतकरी संघ संचालक व शहीद अब्दुल हमीद सोसायटीचे चेअरमन अबूताहेर तकीलदार यांचे हस्ते करण्यात आले. पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते यावेळी श्रीफळ वाढवण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेविका रेश्मा बुडडेखान म्हणाल्या की, या प्रभागाला मागील काळात पायाभूत व मूलभूत सुविधापासून वंचित ठेवण्यात आले होते. आता माझ्या कार्यकाळात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून प्रभागामध्ये लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे पती नौशाद बुडडेखान यांनी या अगोदर निःस्वार्थपणे सामाजिक कार्य केले त्याचीच पोचपावती म्हणजे या वॉर्डातील जनतेने मला त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे आणि या संधीचे मी नक्कीच सोने करणार.
शुभारंभ प्रसंगी अबूताहेर तकीलदार म्हणाले की, प्रभागाच्या विकासासाठी लागणारा निधी आणण्यासाठी अडचण येत असेल तर तुमच्या सोबत लागेल तेथे येण्याची माझी तयारी आहे. माझी गरज भासेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी असेन.
सदर कार्यक्रमास दिवाकर नलवडे (माजी अध्यक्ष व्यापारी संघटना,आजरा), राजू कुलकर्णी, अब्दुल माणगावकर, राहुल कोरे, दस्तगीर मकानदार, रमेश कारेकर, जबीऊल्ला फकीर, राकेश नलवडे, राजू विभुते आदिजण उपस्थित होते.
प्रभाग क्र. 9 मधील सुभाष गल्ली रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
|