राशिभविष्य
छ. प्रमिलाराजे रुग्णालयात कमी दरातील वस्तू विक्री केंद्राचे लोकार्पण
By nisha patil - 8/14/2025 2:37:42 PM
Share This News:
छ. प्रमिलाराजे रुग्णालयात कमी दरातील वस्तू विक्री केंद्राचे लोकार्पण
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘स्वयंम शॉपी’ व ‘व्हॅन’चे लोकार्पण
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे रुग्णांसाठी आवश्यक वस्तू 50% कमी दरात उपलब्ध करून देणाऱ्या विक्री केंद्राचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बचत गटातील महिलांच्या ‘स्वयंम’ संस्थेच्या स्वयंम शॉपी आणि स्वयंम व्हॅन यांचेही लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक वस्तू कमी दरात सहज उपलब्ध होणार असून, महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
छ. प्रमिलाराजे रुग्णालयात कमी दरातील वस्तू विक्री केंद्राचे लोकार्पण
|