डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक करिअर डेव्हलपमेंट विभागाचे उद्घाटन
कोल्हापूर : डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक करिअर डेव्हलपमेंट, प्लेसमेंट आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
या विभागात १२४ आसनी उच्च तंत्रज्ञानयुक्त कॉम्प्युटर लॅब, वातानुकूलित सेमिनार हॉल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मुलाखत कक्ष अशा सुविधा उपलब्ध आहेत.
डॉ. पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे हे आमचे ध्येय आहे.”
ऋतुराज पाटील म्हणाले, “विद्यार्थी नोकरीसोबत उद्योजकतेसाठीही तयार होतील.”
कार्यक्रमाला डॉ. आर. के. शर्मा, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. एस. डी. चेडे, सुदर्शन सुतार, मकरंद काईगडे आदी मान्यवर उपस्थित होते.