बातम्या
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
By nisha patil - 12/15/2025 5:54:32 PM
Share This News:
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
कोल्हापूर १५ डिसेंबर: प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात ‘स्टेम’ अध्यापनशास्त्र “इनोवेटीव स्टेम पेडागॉजी :ब्रीजिंग थिअरी अँड प्रॅक्टिस” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. अजय साळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, "स्टेम (STEM) अध्यापनशास्त्र विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून गरजेची बाब आहे. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे होत्या.
समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. एन. डी. देशमुख, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, कादंबरी खांडेकर, डॉ. अंजली गायकवाड, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, ममता घोटल, अतुल जाधव उपस्थित होते. विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राध्यापक यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
|