बातम्या

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे गोकुळ शिरगांवात उद्घाटन

Inauguration of district level elocution competition at Gokul Shirgaon


By Administrator - 7/28/2025 12:50:26 PM
Share This News:



जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे गोकुळ शिरगांवात उद्घाटन

 विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन

गोकुळ शिरगाव (ता. करवीर)  सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गोकुळ शिरगांव येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

या वेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरपंच चंद्रकांत डावरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. डी. पाटील सर, टी. के. पाटील (आण्णा), नायकवडे सर, शंकरराव पाटील, सर्जेराव मिठारी, आदिनाथ पाटील, प्राचार्य तेजस पाटील, सतीश एरंडोले, प्रकाश तारदाळे, सुनील पाटील, विकास पाटील, वसंत डावरे, शामराव पाटील, विलास पाटील, जयसिंग पाटील, सौ. केसरकर मॅडम यांच्यासह शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वक्तृत्वकलेचे महत्त्व, आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय आणि संविधानिक मूल्यांची जाणीव यावर मार्गदर्शन करण्यात आले.


जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे गोकुळ शिरगांवात उद्घाटन
Total Views: 53