शैक्षणिक
शहाजी महाविद्यालयात पर्यावरण पूरक रक्षाबंधन व स्टडी कॉर्नरचे उद्घाटन
By nisha patil - 6/8/2025 4:13:35 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयात पर्यावरण पूरक रक्षाबंधन व स्टडी कॉर्नरचे उद्घाटन
झाडांना राख्या बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
दसरा चौकातील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातर्फे पर्यावरण पूरक रक्षाबंधन आणि स्टडी कॉर्नरचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून एक वेगळा संदेश दिला, तर विविध बियांपासून तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे प्रदर्शनही भरवण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. ए. पी. जंगम यांनी "बीएससी नंतरच्या करिअरच्या संधी" या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर विज्ञान विभागातील विविध शाखांच्या स्टडी कॉर्नरचे उद्घाटनही त्यांनी केले.
या वेळी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे राखी साजरी करताना झाडांचे संरक्षण हा मुख्य उद्देश ठेवल्याचे प्रा. ए. व्ही. मगदूम पाटील यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या बियांपासून बनवलेल्या राख्यांचे विशेष कौतुक झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. याशिवाय प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, तसेच विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. ए. व्ही. मगदूम पाटील यांनी केले, तर प्रा. एस. व्ही. कुंभार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
शहाजी महाविद्यालयात पर्यावरण पूरक रक्षाबंधन व स्टडी कॉर्नरचे उद्घाटन
|