बातम्या
आजरा ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा केंद्राचे लोकार्पण
By nisha patil - 4/22/2025 8:31:15 PM
Share This News:
आजरा ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा केंद्राचे लोकार्पण
30 बेडचे रुग्णालय आता 50 बेडचे होणार – ना. आबिटकर
आजरा येथील ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लोकार्पण ना. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या वेळी ना. आबिटकर म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात 30 बेड क्षमतेचे रुग्णालय लवकरच 50 बेड क्षमतेचे करण्यात येणार असून सर्व सुविधा पुरवण्यात येतील. नवीन डायलिसिस केंद्रामुळे रुग्णांचा आर्थिक भार कमी होणार असून, आता मोफत औषधोपचार उपलब्ध होतील.
आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी सांगितले की, राज्यात 449 डायलिसिस केंद्रे मंजूर असून आतापर्यंत 50 कार्यरत आहेत. आजरातील केंद्रात 5 अत्याधुनिक डायलिसिस बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा जोत्स्ना चराटे-पाटील, डॉ. सुप्रिया देशमुख, तहसिलदार समीर माने, डॉ. अमोल पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.
आजरा ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेवा केंद्राचे लोकार्पण
|