बातम्या

अन्याय निवारण समितीच्या नगरसेवक कार्यालयाचे दिमाखात उदघाट्न

Inauguration of the Injustice Prevention


By nisha patil - 2/2/2026 6:28:22 PM
Share This News:



अन्याय निवारण समितीच्या नगरसेवक कार्यालयाचे दिमाखात उदघाट्न
 

आजरा (हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या निवडणूकीची मुदत संपून गेली होती.प्रशासकानी आपल्या हातात नगरपंचायतीची सूत्रे घेतली होती. लोकांच्या अनेक पायाभूत, मूलभूत आणि दैनंदिन गरजासाठी वणवण करण्याची पाळी आली होती. नगरपंचायत होताच घरफाळ्याचा दणका राहिवाशीयांना बसणार होता. यावेळी अन्याय निवारण समितीची स्थापना झाली. पक्षपात विरहित केवळ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बामणे भाऊजी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आपले कार्य सुरु केले. अवाजवी वाढीव घरफळा रद्द करून जनतेला न्याय मिळवून देण्याची पहिली पायरीच यशस्वी ठरली होती.

आणि त्यानंतर जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी समितीचा लढा सुरु झाला. कचरा उठाव, भटकी कुत्री, पाणी पुरवठा, आरोग्याचे प्रश्न, रस्ते, गटारी, दिवाबत्ती यासारख्या अनेकविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीकडून चोखपणे पार पडले. त्याच अन्याय निवारण समितीतून निवडून आलेले अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष बामणे भाऊजी यांनी वॉर्ड क्र. 15 मध्ये तेथील रहिवाशीयांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनतेच्या हक्काचे *आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती नगरसेवक कार्यालय सुरु केले. या कार्यालयाचे उदघाट्न डॉ. श्रद्धानंद ठाकूर आणि समितीच्या नूतन नगरसेविका सौ. स्मिता कुंभार यांच्या हस्ते रवळनाथ कॉलनी येथे करण्यात आले.
   

जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांचा उरक करणारे आणि त्यांच्या वेदना, अडचणी समजून घेणारे त्याचप्रमाणे लोकहितासाठी सदैव झटणारे नगरसेवक बामणे भाऊजी यांनी प्रभागाबरोबरच इतरांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळावे आणि लोकांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी या कार्यालयाची सुरवात केली आहे. आजरा अन्याय निवारण समिती कार्यालय म्हणजे सामान्य नागरिकांच्या हक्काचे रक्षण करणारे केंद्र, अन्यायाविरोधातील लढ्याचे व्यासपीठ आणि जनतेच्या सेवेसाठी उघडलेले लोकांचे कार्यालय आहे असे यावेळी कार्यालयाचे उदघाटक डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांनी गौरवॊदगार काढले. आपले मनोगत व्यक्त करताना बामणे भाऊजी म्हणाले की, या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यावर न्याय मिळवून देण्यासाठी 24 तास या कार्यालयातून प्रभावी प्रयत्न केले जातील.
 

 यावेळी दयानंद भुसारी, अरुण देसाई, सचिन बिरजे, सुधीर कुंभार, गौरव देशपांडे, जावेदभाई पठाण, पांडुरंग सावरतकर, विजय थोरवत, मनवेल बारदेस्कर, बंडोपंत चव्हाण, चंद्रकांत पारपोलकर, संतोष बांदिवडेकर, मिनिन डिसोझा, रामचंद्र पंडित, अभिजित संकपाळ तसेच अन्याय निवारण समिती व रवळनाथ कॉलनी मराठा प्रतिष्ठाणचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अन्याय निवारण समितीच्या नगरसेवक कार्यालयाचे दिमाखात उदघाट्न
Total Views: 347