बातम्या
तरुणांच्या हक्काच व्यासपीठ ‘व्हिजन १००’ या उपक्रमाचे उद्घाटन
By nisha patil - 8/26/2025 3:02:34 PM
Share This News:
तरुणांच्या हक्काच व्यासपीठ ‘व्हिजन १००’ या उपक्रमाचे उद्घाटन
कोल्हापूर दि. 26: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये व्हिजन १०० या सेवाभावी संस्थेचा उद्घाटन सोहळा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज यादव तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राहुल आर. आर पाटील यांनी व्हिजन १०० चा पहिलाच उपक्रम म्हणून युनिफॉर्म बँक ही अनोखी योजना राबविण्यात येणार असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये १००० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात येणार आहे याची माहिती दिली. तसेच १५ दिवसांचा वकृत्व अभ्यासिका मार्गदर्शन कोर्स श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये मोफत देण्यात येणार आहे याची घोषणा देखील केली. या कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या जयंती निमित्त करण्यात आले होते.
स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांची वक्तृवबद्दलची असणारी आवड आणि त्याचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसाठीचे शैक्षणिक योगदान याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे यांनी व्हिजन १०० या उपक्रमाबद्दल माहिती देताना या उपक्रमाचा उपयोग तरुण व होतकरू वर्गासाठी कसा होईल हे सांगितले तसेच भविष्यात अशा चांगल्या सामाजिक उपक्रमांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण नेहमी प्रोत्साहन देऊ अशी ग्वाही देखील दिली. यावेळी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार यांनी देखील मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. विक्रांत पाटील यांनी केले. आभार व सुत्रसंचालन डॉ. सिध्दार्थ घोडेराव यांनी केले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुणांच्या हक्काच व्यासपीठ ‘व्हिजन १००’ या उपक्रमाचे उद्घाटन
|