बातम्या
तेलवे येथे ७२ लाखांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण
By nisha patil - 4/15/2025 4:05:39 PM
Share This News:
तेलवे येथे ७२ लाखांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण
खासदार धैर्यशिल माने व आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते कामांना शुभारंभ
पन्हाळा तालुक्यातील तेलवे (ता. पन्हाळा) येथे ७२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन खासदार धैर्यशिल माने (दादा) आणि आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या विकास कामांमध्ये भैरवनाथ मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे (१० लाख), महादेव मंदिर परिसराचे क्रॉक्रिटीकरण (१० लाख), बेघर वसाहतीतील रस्ते व गटार बांधणी (७ लाख), नदीकडे जाणारा रस्ता (२५ लाख), तसेच विद्या मंदिर तेलवे येथे दोन शाळा खोल्यांचे बांधकाम (२० लाख) यांचा समावेश आहे.
या कामांसाठी एकूण ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
याप्रसंगी जनसुराज्य शक्तीचे गटप्रमुख आर.एस. पाटील (बापू), रामचंद्र सुतार, भिकाजी भोसले, शहाजी भोसले, माजी सरपंच शरद पाटील, तानाजी पाटील, बाजीराव पाटील, निरंजन पाटील, बाबुराव भोसले, सागर पाटील, शामराव पाटील, अमोल कुंभार, योगेश तेलवेकर, दिपक पाटील, सुरेश वडर, दिपक थोरात, श्रीकांत पाटील, विक्रांत पाटील, कपिल सुतार, विनोद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेलवे येथे ७२ लाखांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण
|