ताज्या बातम्या

इचलकरंजीत जलपुरवठ्याच्या पाइपलाइन बदल कामाचा शुभारंभ

Inauguration of water supply pipeline replacement work in Ichalkaranjit


By nisha patil - 7/21/2025 2:36:48 PM
Share This News:



इचलकरंजीत जलपुरवठ्याच्या पाइपलाइन बदल कामाचा शुभारंभ

 प्रकाशआण्णा व डॉ. राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याची हमी

 इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठा अधिक वेळेवर आणि नियमित व्हावा यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या निधीतून जिमन्याशीयम मैदान ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यानच्या जुन्या पाइपलाइनच्या बदल कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला.

या कामामुळे इचलकरंजीतील जलपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना नियोजित वेळेत शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.

या प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात भूमिपूजनाच्या माध्यमातून नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.


इचलकरंजीत जलपुरवठ्याच्या पाइपलाइन बदल कामाचा शुभारंभ
Total Views: 97