विशेष बातम्या

पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य – डॉ. गणेश कदम

Income increase possible through crop diversification


By nisha patil - 5/6/2025 5:51:57 PM
Share This News:



पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य – डॉ. गणेश कदम
 

कोल्हापूर – डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने ‘विकसित कृषी समृद्ध अभियान’ अंतर्गत मजरे कासरवाडा, तिटवे व अर्जुनवाड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे येथील डॉ. गणेश कदम यांनी सांगितले की, “सजावटी फुलांचे उत्पादन ही मोठी आर्थिक संधी असून, पीक विविधतेमुळे उत्पन्नवाढ शक्य आहे.”

या वेळी डॉ. जयवंत जगताप, डॉ. बशीत रझा, डॉ. संभाजी जाधव यांनी भात, ऊस, मृदा आरोग्य व पशुपालनावर मार्गदर्शन केले. रथपूजन सोहळा युवराज वारके व श्रुतिका नलवडे यांच्या हस्ते झाला.

कार्यक्रमात अनेक शेतकरी, महिला शेतकरी व युवा उद्योजक उपस्थित होते.


पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य – डॉ. गणेश कदम
Total Views: 194