बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये इनक्युबेशन प्लेसमेंट ड्राईव्ह मधून
By nisha patil - 9/18/2025 2:44:23 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये इनक्युबेशन प्लेसमेंट ड्राईव्ह मधून
40 विद्यार्थ्यांची क्सुय स्पायडर्स कंपनीत मोफत प्रशिक्षणासाठी निवड
कोल्हापूर दि. 18 : महाविद्यालयाच्या इनक्युबेशन प्लेसमेंट ड्राईव्ह तर्फे बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स्, बी.सी.एस. व बी.सी.ए. च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती क्सुय स्पायडर्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्या. या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी ॲप्टीटयूट टेस्ट्, ग्रूप डिस्कशन, व वैयक्तिक मुलाखती घेतल्या. यामधून 40 विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना विविध नामंकित कंपन्यांमध्ये चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध् होणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण, डॉ. संजय लठ्ठे, प्रा. संजय थोरात, डॉ. राजश्री पाटील,
डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, प्रा. विजय पुजारी, डॉ. आशुतोष उपाध्ये, डॉ. अभिजीत कासारकर, प्रा. वृषाली मिसाळ, प्रबंधक श्री सचिन धनवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये इनक्युबेशन प्लेसमेंट ड्राईव्ह मधून
|