विशेष बातम्या
इंगळी ग्रामस्थांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू
By nisha patil - 8/14/2025 2:34:00 PM
Share This News:
इंगळी ग्रामस्थांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचा उपोषणस्थळी पाठिंबा..
इंगळी ग्रामस्थांच्या पायाभूत सुविधांच्या समस्यांवर उपाययोजना न झाल्याने इंगळी शहरप्रमुख केशव पाटील व सहकाऱ्यांनी १२ ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सहा मोठ्या विहिरींचा प्रश्न, भूस्खलनग्रस्त रस्ते व पाणीटंचाई यावर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
उपोषणस्थळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी भेट देत ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर केला व मागण्या न मानल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. या आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
इंगळी ग्रामस्थांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू
|