बातम्या

स्मॅक आयटीआयमध्ये अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा...

Independence Day celebrated in a unique way at Smack ITI


By nisha patil - 8/15/2025 2:58:28 PM
Share This News:



स्मॅक आयटीआयमध्ये अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा...

विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण ; महापारेषण व मर्चंट नेव्हीत विद्यार्थ्यांची निवड

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संचलित श्रीमती सोनाबाई शंकरराव जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे यावर्षी स्वातंत्र्य दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विद्युत सहाय्यक पदावर नुकतीच नियुक्त झालेल्या विद्यार्थिनी स्वालिया जमादार हिच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.

संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची महापारेषणमध्ये तर एका विद्यार्थ्याची मर्चंट नेव्हीत निवड झाली आहे. विद्यार्थिनी स्वालिया जमादार हिने मनोगतात आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, संस्था आणि पालकांना दिले. कार्यक्रमात महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप देबाजे, तंत्रज्ञ पृथ्वीराज माने, अल्फाज मुल्ला तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.देशभक्तीपर गीतांच्या गजरात व मार्गदर्शनपर भाषणांमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.


स्मॅक आयटीआयमध्ये अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा...
Total Views: 95