बातम्या

महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated with enthusiasm


By nisha patil - 8/15/2025 3:02:15 PM
Share This News:



महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राष्ट्रप्रेम कार्यातून जोपासा : बी. जी. बोराडे

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यांनी राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती कार्यातून जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत तसेच एनसीसी, आरएसपी व स्काऊट गाईड पथकांची सलामी सादर झाली. प्राचार्य यु. आर. आतकिरे यांनी प्रास्ताविक केले तर आभार सौ. व्ही. एस. कांबळे यांनी मानले.


महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Total Views: 61