शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य्ा दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 8/16/2025 2:47:02 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य्ा दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर दि. 15 : लाखो भारतीयांच्या त्यागातून व बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न् साकार झाले. एकात्मता ही भारताची शक्ती आहे. ही एकात्मता जपण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न् करायला हवा. आज माणसातले माणूसपण हरवत चालले आहे. विभक्त कुटूंब पध्दत वाढत चालली आहे. अशावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा बाप आणि आई होणे आवश्यक आहे. ज्या मातीत जन्मलो त्याची कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधूभाव, एकसंघ राष्ट् व मानवतेचा संदेश देणाऱ्या घटनेने आपल्या देशाला सामाजिक सुरक्षितता, सहिष्णूता व स्थैर्य प्राप्त करुन दिले. आजच्या युवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी विश्वबंधूत्वाची शिकवण आपल्या प्रार्थनेतून दिली. त्याचे अवलंबन युवकांनी करावे, विद्यार्थ्यांमधील ज्ञानज्योत प्रज्वलीत करण्याचे काम गुरुदेव कार्यकर्त्यांनी करावे, असे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ध्वजारोहण समारंभात बोलताना मांडले. विवेकानंद कॉलेजच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. यावेळी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड संचलन सादर केले. यावेळी संस्थेच्या सचिवा मा.प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ मा.श्री. कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार, प्राचार्य विरेन भिर्डी, प्राचार्य धनराज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्ताने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित केलेल्या समारंभात विवेकानंद कॉलेजमधील सेवानिवृत्त कर्मचारी , पुस्तक लेखक, नेट, सेट, पीएच.डी. पदवी प्राप्त् प्राध्यापकांचा सत्कार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे हस्ते करणेत आला. यावेळी प्रशासकीय कर्मचारी श्री. रवी चौगुले आणि प्रा.सतीश उपळावीकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत मांडले. तसेच बी.ए.भाग 1 मधील विद्यार्थिनी कु. प्राजक्ता गायकवाड हिला वैद्यकीय उपचारासाठी प्रा.डॉ.संजय लठ्ठे यांच्याकडून रुपये 11,000/- चा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा.सुप्रिया पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख प्रा.डॉ.विकास जाधव, मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जे.आर.भरमगोंडा, प्रा संतोष कुंडले, प्रा एस पी थोरात, डॉ.ई.बी.आळवेकर, प्रा सौ शिल्पा भोसले, प्रा.एम.आर.नवले, रजिस्ट्रार श्री. एस के धनवडे, प्रशासकीय कर्मचारी यांनी केले. यावेळी संस्था परिसरातील डॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ.बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्य्ा दिन उत्साहात साजरा
|