शैक्षणिक
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 8/16/2025 12:19:26 PM
Share This News:
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
कोल्हापूर:
दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था परिसरात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे उपस्थितीत व कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री इंद्रजीत बोंद्रे यांचे हस्ते यावेळी ध्वजारोहण झाले.राजर्षी छत्रपती शाहू महाराज व माजी मंत्री स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या अर्ध पुतळ्यास यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री मनीष भोसले, श्री विठ्ठल आंबले,श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, राजर्षी शाहू फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल पाटकर, साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. मनीषा पाटील, श्री शाहू आयटीआयचे प्राचार्य श्री वागरे,श्रीपतराव बोंद्रे दादा इंग्लिश मीडियम च्या प्राचार्य सौ.मोहिते मॅडम, इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, शिक्षक, विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी चे कॅडेट उपस्थित होते .
यावेळी एनसीसीच्या कॅडेट्सनी संचलन केले. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील व प्रा. प्रशांत मोटे यांनी संयोजन केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
|