बातम्या
पुणे पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रा. एन. डी. चौगुले यांची कागल तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू
By nisha patil - 10/16/2026 11:39:45 PM
Share This News:
पुणे पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रा. एन. डी. चौगुले यांची कागल तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू
प्रतिनिधी - अजित बोडके, कागल : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार प्राध्यापक एन. डी. चौगुले सर यांनी कागल तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे प्रा. चौगुले सरांनी सांगितले. कागल तालुक्यातील पदवीधर तरुण, शिक्षक, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील पदवीधर मतदारांशी त्यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कागल शहरासह तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये बैठका, गाठीभेटी घेऊन पदवीधर मतदार नोंदणी आणि जनजागृतीवर भर दिला जात आहे. शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांवर काम करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
या मोर्चेबांधणीला कागल तालुक्यातील पदवीधर वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रा. एन. डी. चौगुले यांची कागल तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू
|