बातम्या
अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंजूर मुजावर यांच्या जाहीरनामा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
By nisha patil - 11/27/2025 12:05:35 PM
Share This News:
अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंजूर मुजावर यांच्या जाहीरनामा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
आजरा (हसन तकीलदार):-आजरा नगर पंचायतीचे नागराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मंजूर दिलावर मुजावर यांच्या जाहीरनाम्याचे व प्रचार कार्यालयाचे अगदी थाटात आणि धडाक्यात उदघाट्न झाले. आंबोली रोडवर, सोनेखान कॉप्लेक्स मध्ये हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन युनूस माणगांवकर ,हुसेन दरवाजकर, सनाउल्लाह चांद, नियामत मुजावर,जुबेर चांद, यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले.प्रास्ताविक ऍड. जावेद दीडबाग यांनी केले तर स्वागत मौजुद माणगावकर यांनी केले.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
नागरिकांच्या गरजांवर आधारित विकासाभिमुख योजनास्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र सुविधा व उपक्रम युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रकल्प
पाणीपुरवठा, रस्ते व ड्रेनेजसाठी तातडीची सुधारणा अल्पसंख्याक व सर्वसामान्यांसाठी न्याय्य सुविधा
*संपर्क कार्यालय उद्घाटन निवडणूक कालावधीत नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आंबोली रोड, आजरा, सोनेखान कॉम्प्लेक्समध्ये संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. येथे दररोज नागरिकांच्या अडचणी, सूचना व विकास कल्पना ऐकून तत्काळ नोंद घेतली जाणार असल्याचे मंजूर मुजावर यांनी सांगितले.यावेळी पुढे ते म्हणाले की, “हा जाहीरनामा म्हणजे केवळ कागद नाही, तर आजऱ्याच्या सर्वांगीण विकासाचं ठोस वचन आहे. आपल्या पाठिंब्याने आपण एक सक्षम, प्रामाणिक व जनसेवकांचे स्थानिक स्वराज्य उभारू. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह या कार्यक्रमाला मिळालेला पाहता आगामी निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. सेक्युलर पक्षानी केवळ मुस्लिम मतांचा वापर करून घेतलाय, मुस्लिम मतांचा विचार कधीच केलेला नाही. प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला फसवलंय म्हणूनच मी ही लढाई लढत आहे. ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे त्यामुळे त्यांना आमचं अस्तित्व दाखवण्याची ही योग्य संधी आहे. कपबशी हे चिन्ह आहे,कबशी चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी उमेर माणगावकर, आली कांडगवकर, सफवान पठाण, अरीन दीडबाग, ताहीर माणगावकर, तमीम नेसरीकर, शाहबाज नेसरीकर, मॉज तकीलदार, शोहेब माणगावकर, अलमान माणगावकर, असिफ आगा, फैज काकतिकार, सुशील लतीफ, आमीनबाबा लमतुरे, गौस माणगावकर, ताहीर लमतुरे, तसेच राहत खिदमत फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मौलाना रिजवान सिद्दीकी यांनी मानले.
अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंजूर मुजावर यांच्या जाहीरनामा व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
|