बातम्या

केवळ १ तास २५ मिनिटांत हैदराबाद – कोल्हापूरहून इंडिगोची नवी फ्लाइट”

IndiGos new flight


By nisha patil - 4/10/2025 10:36:47 AM
Share This News:



कोल्हापूर :- कोल्हापूरच्या हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी भर पडणार आहे. इंडिगो एअरलाइनतर्फे कोल्हापूर ते हैदराबाददरम्यान नवीन थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सेवा येत्या २७ ऑक्टोबरपासून हिवाळी सत्रात कार्यान्वित होणार आहे.

 प्रवास केवळ १ तास २५ मिनिटांचा

नवीन फ्लाइट ६E ७३४४ कोल्हापूरहून हैदराबादसाठी आठवड्यातून चार दिवस (सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार) सकाळी ८:४५ वाजता सुटेल. प्रवासाचा कालावधी केवळ १ तास २५ मिनिटांचा असेल.

 देशातील २५ हून अधिक शहरांना जोडणी

या थेट फ्लाइटमुळे कोल्हापूरकरांना हैदराबादमार्गे देशातील २५ हून अधिक प्रमुख शहरांशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामध्ये म्हैसूर, वडोदरा, गोरखपूर, कडप्पा, विशाखपट्टणम, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, वाराणसी, भुवनेश्वर, मुंबई आदी शहरांचा समावेश आहे.
तसेच अहमदाबाद, श्रीनगर, कोची, इंदौर, कोईम्बतूर यांसारख्या ठिकाणी दुपारनंतर पोहोचणे सोयीचे होईल.

 आंतरराष्ट्रीय जोडणी

या नवीन सेवेबरोबरच हैदराबादमार्गे दोहा या आंतरराष्ट्रीय फ्लाइटचे कनेक्शनदेखील उपलब्ध राहणार आहे.

 विमानतळ प्रशासनाची तयारी

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले की, इंडिगोच्या विद्यमान हैदराबाद व बंगळूर फेऱ्यांच्या वेळेत ५ ते १० मिनिटांचा किरकोळ बदल करण्यात आला आहे.


केवळ १ तास २५ मिनिटांत हैदराबाद – कोल्हापूरहून इंडिगोची नवी फ्लाइट”
Total Views: 66