बातम्या

इंडिया आघाडीची अजिंक्यतारा येथे बैठक...

India Aghadi meeting at Ajinkyatara


By nisha patil - 5/31/2025 3:30:03 PM
Share This News:



इंडिया आघाडीची अजिंक्यतारा येथे बैठक...

सतेज पाटील व शाहू महाराज यांचा कार्यकर्त्यांना आदेश – तातडीने कामाला लागा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी कोल्हापुरातील अजिंक्यतारा येथे पार पडली. या बैठकीत सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन सर्व निवडणुका एकजुटीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठका घेऊन स्थानिक पातळीवर संवाद साधण्याचे व सर्व घटकांना सोबत घेण्याचे आवाहन केले. तसेच खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुकांसाठी तत्काळ कामाला लागण्याचे स्पष्ट आदेश यावेळी दिले.

या बैठकीस शिवसेना (उबाठा)चे संजय पोवार, माजी आमदार राजूबाबा आवळे, विजय देवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व्ही.बी. पाटील, आर. के. पोवार, सतिशचंद्र कांबळे, राहुल पाटील, तसेच सरलाताई पाटील, भारती पोवार, सुलोचना नायकवडी, चंद्रकांत यादव, सुनिल मोदी, दिलीप पोवार यांसह अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत संघटन बळकट करण्यावर आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला.


इंडिया आघाडीची अजिंक्यतारा येथे बैठक...
Total Views: 101