बातम्या

‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि ‘डान्स क्वीन’ गौतमी पाटील एका फ्रेममध्ये!

Indian Idol fame Abhijeet Sawant and 'Dance Queen


By nisha patil - 10/31/2025 4:50:30 PM
Share This News:



इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि ‘डान्स क्वीन’ गौतमी पाटील एका फ्रेममध्ये! 

 नव्या प्रोजेक्टची जोरदार चर्चा सोशल मीडियावर

‘इंडियन आयडॉल’चा पहिला विजेता अभिजीत सावंत आणि नेहमीच चर्चेत असणारी नृत्यांगना गौतमी पाटील आता एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गौतमीने नुकताच अभिजीतसोबतचा फोटो ‘NEW’ या कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, दोघेही नव्या गाण्यात किंवा म्युझिक व्हिडिओत झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिजीत सावंतने नुकतीच संगीत क्षेत्रातील 20 वर्षे पूर्ण केली असून ‘प्रेमरंग सनेडो’, ‘चाल तुरू तुरू’ यांसारख्या गाण्यांनी यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. तर गौतमी पाटील ‘प्रेमाची गोष्ट 2’मधील आयटम सॉन्गमुळे पुन्हा चर्चेत आली होती. आता या दोघांच्या कोलॅबोरेशनकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि ‘डान्स क्वीन’ गौतमी पाटील एका फ्रेममध्ये!
Total Views: 37