खेळ

इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा बांगलादेश दौरा; बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले

Indias tour of Bangladesh after England tour

By nisha patil - 4/15/2025 4:13:00 PM
Share This News:

इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा बांगलादेश दौरा; बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले

इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया ऑगस्ट 2025 मध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने या मर्यादित षटकांच्या मालिकेचे अधिकृत वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. दौऱ्यात तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे.

एकदिवसीय मालिकेला 17 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून पहिला सामना मिर्पूरमध्ये खेळवला जाईल. सध्या भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडू आयपीएलच्या अठराव्या हंगामात व्यस्त आहेत. या हंगामानंतर भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यानंतर लगेचच बांगलादेश दौऱ्याची मालिका सुरू होईल.

इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा बांगलादेश दौरा; बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले
Total Views: 468