बातम्या
शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी जयंती साजरी
By nisha patil - 11/19/2025 5:53:44 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी जयंती साजरी
कोल्हापूर, दि. १९ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात आज भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिंसा व एकतेची शपथ ग्रहण करण्यात आली.
कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव, गजानन पळसे, सुरेश बंडगर, सुरेखा अडके, अनिल साळोखे, प्रांजली क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी जयंती साजरी
|