बातम्या
महापालिकेत इंदिरा गांधी जयंती साजरी; राष्ट्रीय एकात्मतेची घेतली शपथ!
By nisha patil - 11/19/2026 8:35:34 PM
Share This News:
महापालिकेत इंदिरा गांधी जयंती साजरी; राष्ट्रीय एकात्मतेची घेतली शपथ!
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. देशाचे स्वातंत्र्य, एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी तसेच ती अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला.
या कार्यक्रमाला मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव दिवाकर कारंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेत इंदिरा गांधी जयंती साजरी; राष्ट्रीय एकात्मतेची घेतली शपथ!
|