ताज्या बातम्या
इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा साधेपणात पार पडला; जावई साहिल चिलाप कोण आहेत जाणून घ्या!
By nisha patil - 6/11/2025 10:48:22 AM
Share This News:
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या प्रभावी आणि विनोदी शैलीतील किर्तनांमुळे कायम चर्चेत असतात. शेतकरी, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक नातेसंबंध, व्यसनमुक्ती आणि समाजातील विविध विषयांवर ते किर्तनाच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या संदेशात विनोदाची छटा असली तरी त्यामागे खोल अर्थ असतो. इंदुरीकर महाराज नेहमीच सांगतात की लग्न म्हणजे प्रतिष्ठेचा विषय नसून, संस्कार जपण्याची एक संधी आहे आणि तो समारंभ शक्य तितक्या साधेपणाने पार पाडावा.
या विचाराचं प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी स्वतःच्या कुटुंबातही दाखवून दिलं आहे. नुकताच त्यांच्या मुलीचा, ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने संगमनेर येथे पार पडला. या कार्यक्रमात ना हारतुरे, ना शालसत्कार — फक्त संस्कारांचा आणि साधेपणाचा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिला.
ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा पार पडला असून, यानंतर इंदुरीकर महाराजांचे अनुयायी आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे. मूळचे ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत. उच्च शिक्षित असलेले साहिल आपल्या गावात मोठ्या बागायती शेतीचे मालक आहेत. समाजात नेहमीच साधेपणाचा आणि विवेकाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्याद्वारेही ‘साधेपणातच मोठेपणा’ हे दाखवून दिलं आहे.
इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा साधेपणात पार पडला; जावई साहिल चिलाप कोण आहेत जाणून घ्या!
|