बातम्या

पीएम सूर्य घर व 'स्मार्ट' योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार 'किओस्क'

Information on PM Surya Ghar


By nisha patil - 9/16/2026 9:46:11 PM
Share This News:



पीएम सूर्य घर व 'स्मार्ट' योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार 'किओस्क'

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान 'सेवा सेतू कॅम्प'चे आयोजन

ऑनलाईन अर्ज आणि बँक कर्जाची सुविधा एकाच छताखाली

मुंबई,  दिनांक १६ सप्टेंबर, २०२६ केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा सेतू कॅम्प'चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' आणि 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)' योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरण तालुका पातळीवर विशेष 'किओस्क' उभारणार आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सर्व तालुका पातळीवर हे किओस्क उभारण्याचे निर्देश दिले आहेत. या किओस्कच्या माध्यमातून ग्राहकांना रूफटॉप सौर ऊर्जा योजनांचा लाभ घेण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाईल.

किओस्कमध्ये सौर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिक व मार्गदर्शन महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाईल.विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना घटनास्थळीच ऑनलाईन अर्ज भरण्यासोबतच सोलर सिस्टीमसाठी लागणाऱ्या बँक कर्जासाठीही अर्ज करता येईल. 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' आणि 'स्मार्ट' योजनेची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

नागरिकांनी महावितरणच्या या उपक्रमाचा आणि सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


पीएम सूर्य घर व 'स्मार्ट' योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार 'किओस्क'
Total Views: 17