बातम्या
कोल्हापुरात अमानवी घटना: मानसिक आजारी महिलेला साखळदंडात ठेवले, पोलिसांची सुटका
By nisha patil - 5/30/2025 3:41:26 PM
Share This News:
कोल्हापुरात अमानवी घटना: मानसिक आजारी महिलेला साखळदंडात ठेवले, पोलिसांची सुटका
कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या 40 वर्षीय सारिका साळी या महिलेला तब्बल दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवण्यात आलं होतं. क्राईम ब्रँच व राजारामपुरी पोलिसांनी धाडसाखत महिलेची सुटका केली असून, तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
महिला तिच्या भाच्याकडे राहत होती आणि मानसिक स्थितीमुळे ती रस्त्यावर काहीही उचलून खाण्याचा प्रयत्न करत होती, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस या प्रकारामागचं नेमकं कारण शोधत असून, ही घटना संपूर्ण जिल्ह्यासाठी लाजीरवाणी ठरत आहे.
कोल्हापुरात अमानवी घटना: मानसिक आजारी महिलेला साखळदंडात ठेवले, पोलिसांची सुटका
|