बातम्या
आतली बातमी फुटली’ – नवरा-बायकोच्या नात्यातून उलगडणार खुनाच्या सुपारीचं रहस्य!
By nisha patil - 8/21/2025 4:09:44 PM
Share This News:
आतली बातमी फुटली’ – नवरा-बायकोच्या नात्यातून उलगडणार खुनाच्या सुपारीचं रहस्य!
मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच एकत्र – १९ सप्टेंबरला रंगणार धमाल
मुंबई :मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या आशयाचे प्रयोग सुरू असतानाच आता प्रेक्षकांसमोर एक भन्नाट क्राईम-कॉमेडी सिनेमा येतोय. ‘आतली बातमी फुटली’ या नव्या चित्रपटाचा उलगडा १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार आहे.
नवरा-बायकोच्या नात्यातील गुंतागुंतीपासून सुरुवात होणारी ही कथा खुनाच्या सुपारीभोवती फिरते. एका जोडप्याच्या आयुष्यात आलेल्या वळणामुळे निर्माण होणारा गोंधळ, रहस्य आणि हशा यांनी भरलेली ही फिल्म प्रेक्षकांना मनोरंजनाची अनोखी ट्रीट देणार आहे.
या सिनेमाची सर्वात मोठी आकर्षणं म्हणजे एकाच पडद्यावर एकत्र दिसणारे दिग्गज कलाकार – मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि सिद्धार्थ जाधव. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर यांची रंगतदार साथ आहे.
चित्रपटातील ‘सखूबाई’ आणि ‘चंद्राची गोष्ट’ ही गाणी आधीच सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. त्यामुळे चित्रपटाची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.
दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी सादर केलेला हा सिनेमा अनपेक्षित वळणं आणि धक्कादायक ट्विस्टने प्रेक्षकांना ‘सरप्राईज’ करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
आतली बातमी फुटली’ – नवरा-बायकोच्या नात्यातून उलगडणार खुनाच्या सुपारीचं रहस्य!
|