ताज्या बातम्या

दुधाळी एसटीपी प्लांटची पाहणी: दुर्गंधी नसल्याचा समितीचा निष्कर्ष

Inspection of Dudhali STP plant


By nisha patil - 11/22/2025 12:00:37 PM
Share This News:



दुधाळी  : सांडपाणी शुद्धीकरण क्षमता वाढवण्याची हिंदू जनसंघर्ष समितीची मागणीदुधाळी येथील एसटीपी प्लांटची पाहणी हिंदू जनसंघर्ष समितीने केली. आधुनिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या प्लांटमध्ये कुठलीही दुर्गंधी किंवा अस्वच्छता नसल्याचे स्पष्ट झाले.

नागरिकांमध्ये पसरलेल्या गैरसमजामुळे शहरातील नवीन एसटीपी प्रकल्पांना विरोध होत असल्याने समितीने महापालिकेला जनजागृतीसाठी माहितीपट प्रसिद्ध करण्याची विनंती केली.
तसेच केवळ २५% सांडपाणी शुद्ध होत असल्याने दुधाळी प्लांटची क्षमता वाढवून १००% सांडपाणी शुद्ध करण्याची मागणी समितीने केली. पंचगंगा नदी प्रदूषण थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही समितीने नमूद केले.


दुधाळी एसटीपी प्लांटची पाहणी: दुर्गंधी नसल्याचा समितीचा निष्कर्ष
Total Views: 30