बातम्या
*हाजगोळीखुर्द ता. आजरा येथील ग्रामपंचायतीची कागदपत्रे, दप्तर तपासणी सुरु*
By nisha patil - 9/30/2026 4:09:47 PM
Share This News:
*हाजगोळीखुर्द ता. आजरा येथील ग्रामपंचायतीची कागदपत्रे, दप्तर तपासणी सुरु*
*आजरा(हसन तकीलदार):-हाजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक येळणे यांच्यावर अनेक तक्रारी करीत त्यांची बदली करून तालुक्याबाहेरील कमिटीतर्फे चौकशी व तपासणी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमार्फत करण्यात आली होती.
त्यानुसार मंगळवार दि. 29/09/2026 रोजी गडहिंग्लज पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विलास पाटील आणि विस्तार अधिकारी उत्तम पाटील यांच्यातर्फे ग्रामपंचायतीतील दप्तर कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. हाजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामसेवक येळणे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दि. 19/08/2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ग्रामपंचायत ऑफिस सील केले होते.
त्यानंतर येळणे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. सहा दिवसानंतर ऑफिसच्या मुख्य दरवाजाचे सील उघडून ऑफिसच्या आतील दप्तर सील करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी तपास अधिकारी तालुक्याबाहेरील असावा अशी मागणी केली होती. त्यानुसार या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रशांत कोटकर, ग्रामपंचायत सदस्य आदित्य कातकर, ग्रामपंचायत सदस्या गीता सुतार, ग्रामस्थ डॉ. रोहन जाधव, पांडुरंग जाधव, डॉ. सुधाकर जाधव, संदीप गिलबिले सुबोध कांबळे आदिजण उपस्थित होते.
*या संपूर्ण प्रकरणाचे सविस्तर वृत्तांत आमच्या चॅनेलने प्रसिद्ध केले होते
*हाजगोळीखुर्द ता. आजरा येथील ग्रामपंचायतीची कागदपत्रे, दप्तर तपासणी सुरु*
|