बातम्या

इचलकरंजीत नर्सिंग कॉलेजसाठी आ. राहुल आवाडेंकडून जागांची  पाहणी!

Inspection of the seats for Ichalkaranjit


By nisha patil - 11/13/2026 7:49:43 PM
Share This News:



इचलकरंजीत नर्सिंग कॉलेजसाठी आ. राहुल आवाडेंकडून जागांची  पाहणी!

इचलकरंजी शहरातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टीने बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महाविद्यालयासाठी योग्य जागेची उपलब्धता आणि आवश्यक पायाभूत सुविधांची पाहणी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी केली. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १५ आणि शाळा क्रमांक ३४ येथील जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, जागेची उपलब्धता तसेच इतर तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला.

महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि तरतुदी करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे इचलकरंजीत बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे महाविद्यालय सुरू झाल्यास इचलकरंजीसह परिसरातील विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणासाठी स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध होणार आहे. तसेच आरोग्य सेवा क्षेत्रासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार आहे. या पाहणीवेळी आरोग्य सेवा व शुश्रूषा विभागाचे उपसंचालक, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी, डॉक्टर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


इचलकरंजीत नर्सिंग कॉलेजसाठी आ. राहुल आवाडेंकडून जागांची  पाहणी!
Total Views: 16