बातम्या
आजरा एस. टी. स्टॅंडवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावा -रिपब्लिकन सेनेची मागणी *
By Administrator - 3/14/2026 1:25:34 PM
Share This News:
आजरा एस. टी. स्टॅंडवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावा -रिपब्लिकन सेनेची मागणी *
आजरा (हसन तकीलदार):-आजरा एस टी स्टॅंडवर वाढती प्रवाशांची गर्दी तसेच तेथे घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे युवकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी व विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी याठिकाणी पोलिसांचीही आवश्यकता आहे. या बाबींचा विचार करता आजरा एस टी स्टॅंडवर सीसीटीव्ही व बंदोबस्तीसाठी दोन पोलीस तैनात करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजरा एस टी.स्टँडवर दिवसाढवळ्या पाकीट मारणे, महिलांचे दागिने चोरणे अशा घटना घडत आहेत. महाविद्यालयांचे युवक हुल्लडबाजी करीत मारामारी करीत असतात, मुलींची छेड काढण्याचेही प्रमाण वाढत आहे. दारुडे, नशेबाज प्रवाशासोबत, वाहक, चालकांशी वाद घालत असतात. परिणामी वाद विकोपावर जाऊन भांडणे होतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एस. टी. स्टॅंडवर कायमस्वरूपी दोन पोलीस तैनात करणेत यावीत व आजरा एस. टी.स्टॅंडपरिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणेत यावीत अशी मागणी रिपब्लिकन सेना,आजरा तर्फे करण्यात आली आहे. निवेदनावर परशुराम कांबळे, मधुकर कांबळे, अविनाश कांबळे, सुरेश दिवेकर, संभाजी कांबळे, किरण के के (बहुजन मुक्ती पार्टी, कागल विधान सभा )आदींच्या सह्या आहेत.
आजरा एस. टी. स्टॅंडवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावा -रिपब्लिकन सेनेची मागणी *
|