बातम्या
भारतीय कंपनी सचिव संस्थेचा (ICSI) निकाल जाहीर; कोल्हापूर विभागातील ४८ विद्यार्थी उत्तीर्ण
By nisha patil - 11/16/2026 7:48:03 PM
Share This News:
भारतीय कंपनी सचिव संस्थेचा (ICSI) निकाल जाहीर; कोल्हापूर विभागातील ४८ विद्यार्थी उत्तीर्ण
कोल्हापूर : भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या (ICSI) कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) ऑक्टोबर २०२६ सत्राचा निकाल १५ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
देशभरातील संबंधित प्रादेशिक आणि अध्याय कार्यालयांना या निकालाची माहिती देण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२६ च्या या परीक्षेत देशभरातून एकूण १,१११ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
कोल्हापूर विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशाबद्दल कोल्हापूर चॅप्टरचे चेअरमन सी.एस. सुशील पाटोळे तसेच मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
— सी.एस. सुशील पाटोळे, चेअरमन, कोल्हापूर चॅप्टर, ICSI
भारतीय कंपनी सचिव संस्थेचा (ICSI) निकाल जाहीर; कोल्हापूर विभागातील ४८ विद्यार्थी उत्तीर्ण
|